Ujani's water level finally reaches 50 percent 
मुख्य बातम्या

`उजनी`ची पाणी पातळी अखेर ५० टक्क्यांपर्यंत

सोलापूर ः उजनी धरणाकडे येणाऱ्या दौंडकडील विसर्गात घट होत असली, तरी त्यात सातत्य आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीपातळी संथ गतीने पन्नाशीकडे वाटचाल करत आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः उजनी धरणाकडे येणाऱ्या दौंडकडील विसर्गात घट होत असली, तरी त्यात सातत्य आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीपातळी संथ गतीने पन्नाशीकडे वाटचाल करत आहे. शनिवारी (ता.३१) सकाळी धरणाने ४८.४० टक्के इतकी पातळी गाठली. सायंकाळपर्यंत ती ५० टक्कयापर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. 

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसाने २२ जुलैपासून गेल्या आठ ते दहा दिवसांत ५० टक्के पाणी पातळी वाढली आहे. २२ जुलै रोजी उजनी धरण उणे पातळीतून बाहेर आले. गेल्या तीन वर्षात प्रथमच उजनी जुलैमध्ये पन्नास टक्के भरणार आहे. मात्र २५ जुलैपासून पुणे जिल्ह्यातील पावसाने उसंत घेतल्याने दौंड येथील विसर्गात घट होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे उजनी पन्नाशीकडे संथ गतीने वाटचाल करत आहे. 

दौंड येथून सध्या ११ हजार ९४५ क्युसेक विसर्गाने पाणी उजनीत मिसळत आहे. या पाण्याच्या या सातत्याच्या प्रवाहामुळे धरणात सध्या ८९.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी २५.९३ टीएमसी उपयुक्त साठा आहे. तर पाण्याची टक्केवारी ४८.४० टक्के आहे. सायंकाळपर्यंत धरण ५० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

SCROLL FOR NEXT