रत्नागिरीत लोकसहभागातून दोन हजार कच्चे बंधारे Two thousand raw dams in Ratnagiri through public participation 
मुख्य बातम्या

रत्नागिरीत लोकसहभागातून दोन हजार कच्चे बंधारे

यंदा लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये लाखो लिटर पाण्याचा साठा झाला आहे.

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : पाऊस थांबल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून दर वर्षी ग्रामीण भागात लोकसहभागातून बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली जाते. यंदा लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये लाखो लिटर पाण्याचा साठा झाला आहे.

पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत शासनाने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांवर कच्चे बंधारे लोकसहभागातून बांधण्याची मोहीम चार वर्षांपूर्वी हाती घेतली.

पहिल्याच वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच हजार बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग किनाऱ्यावरील विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी होऊ लागला. ही बाब लक्षात आल्यानंतर दर वर्षी लोकसहभागामधून अशा

प्रकारचे बंधारे बांधले जाऊ लागले. कच्च्या बंधाऱ्यांसाठी सिमेंटच्या पिशव्यांचा पोत्यांचा येतो. तो गावांतील दानशूर व्यक्तीमार्फत होतो. श्रमदानाच्या माध्यमातून उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे काही कोटी रुपयांची बचत होत आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्या, नाल्यांचे पाणीही वेगाने वाहत होते. त्यावर बंधारे बांधणे अशक्य होते. जोर ओसरल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रमदानाने बंधारे बांधण्यास सुरुवात झाली होती.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Committee against HTBT Seeds: ‘एचटीबीटी’ विरोधात समित्यांची स्थापना

PMFME Scheme: अन्नप्रक्रिया प्रकल्पांना १९८२ कोटींचे कर्जवाटप

Agri Trade Policy: तेल तुटवड्यावर तांदळाचा तोडगा

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाचा अंदाज कायम

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT