ठिबक सिंचन
ठिबक सिंचन 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टर सूक्ष्म सिंचनाखाली

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २२ हजार ७५० शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे जिल्हाभरातील २५ हजार हेक्‍टर क्षेत्र तुषार व ठिबर सिंचनाखाली आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.  शासनाने मागील पाच वर्षांत ८६ कोटी चार लाख २८ हजार रुपये निधी सूक्ष्म सिंचनावर खर्च केला आहे. २०१४-१५ मध्ये ठिबक संचासाठी ९,११४ शेतकऱ्यांना, तर तुषार संचासाठी २३१ शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात आले. ठिबकमुळे जिल्ह्यातील १० हजार ८४० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. ०१५-१६ मध्ये ठिबक सिंचनासाठी ३,१०६ शेतकरी, तर तुषार सिंचनासाठी ४२७ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. २०१६-१७ मध्ये ठिबक सिंचनासाठी ११ कोटी ३४ लाख, तर तुषार सिंचनासंबंधी ८३ लाख निधी वितरित केला. यातून ठिबकसाठी ९,१४५, तर तुषार सिंचनांसाठी ४१९ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. अनुदानाचे निकष बदला सुक्ष्म सिंचन किंवा ठिबक अनुदानासंबंधीचे शासनाचे निकष बदलले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकदा ज्या शेतकऱ्याने लाभ घेतला त्याला पुन्हा लाभ दिला जावा. कारण ठिबक यंत्रणा दोन, तीन वर्षांत खराब होते. नवीन यंत्रणा शेतकऱ्यांना घ्यावीच लागते, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT