On the trumpet in Akot taluka Outbreaks appear to be exacerbated during pregnancy 
मुख्य बातम्या

अकोट तालुक्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

अकोट, जि. अकोला ः तुरीचे पीक सध्या बहरात असताना आधी ढगाळ वातावरण आणि आता मर रोगामुळे उभे पीक वाळत आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वाढली आहे. यंदाच्या हंगामात संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर हे नवे संकट उभे राहिले आहे.

टीम अॅग्रोवन

अकोट, जि. अकोला ः तुरीचे पीक सध्या बहरात असताना आधी ढगाळ वातावरण आणि आता मर रोगामुळे उभे पीक वाळत आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वाढली आहे. यंदाच्या हंगामात संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर हे नवे संकट उभे राहिले आहे. 

बुरशीजन्य रोगामुळे तुरीची झाडे वाळत आहेत. आधी पाने पिवळसर पडतात. मुळांच्या आतमध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी रंगाची रेषा दिसून येते. कधी कधी खोडावर पांढरी बुरशीसुद्धा आढळते. या रोगात झाडाचे शेंडे कोमेजतात. झाड बऱ्याच वेळा हिरव्या स्थितीत वाळते. रोगामुळे शेतकऱ्यांची बरीचशी झाडे वाळत असल्याने तुरीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढली आहे.

सततच्या नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर हे नवे संकट उभे ठाकले आहे. आधी ढगाळ वातावरणामुळे फुलांवर आलेल्या तुरीच्या पिकात मोठ्या प्रमाणात फूल गळती झाली होती. त्यांनतर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. मर रोगाने तुरीच्या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हे पीक वाचविण्यासाठी जिवाची पराकाष्ठा करीत आहेत. महागडी कीटकनाशके फवारणी करून आपले पीक कसे वाचणार, यासाठी धडपडत आहेत.

गत आठवड्यात धुके पडल्याने तुरीच्या पिकावर आलेल्या अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने तूर पिकाचे चांगले उत्पादन होणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण शेंगा भरण्याच्या स्थितीत परिसरात धुके पडल्याने तुरीचा फुलोर जळाला. आता उत्पादनात घटीची शक्यता वाढली आहे. - प्रवीण साबळे, शेतकरी, तरोडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT