electricity  
मुख्य बातम्या

वीजबिल थकबाकीमुळे ताकारी सिंचन योजनेत अडथळा

कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍यासह दुष्काळी भागास वरदाई ठरलेल्या ताकारी योजनेची सुमारे १८ कोटी वीजबिल थकबाकी आहे.

टीम अॅग्रोवन

सांगली ः कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍यासह दुष्काळी भागास वरदाई ठरलेल्या ताकारी योजनेची सुमारे १८ कोटी वीजबिल थकबाकी आहे. साखर कारखान्यांकडून गतवर्षीची पाच कोटी पाणी पट्टी थकली आहे. परंतु साखर कारखान्यांकडून पाणीपट्टी भरण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. कारखान्यांकडून वेळेत पाणी पट्टी मिळाली तरच थकीत वीजबिलाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. अन्यथा, भविष्यात योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.  ताकारी उपसा सिंचन योजनेत पाच तालुक्यांचा समावेश आहे. सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या योजनेच्या लाभ क्षेत्रात साखर कारखाने देखील आहेत. ताकारी योजनेची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून जमा करून साखर कारखान्यांकडून पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. गतवर्षी योजनेतून तीन आवर्तन सोडण्यात आली होती. त्याचे वीजबिल अठरा कोटींपर्यंत पोहोचले आहे. साखर कारखान्यांकडून योजनेस सुमारे पाच कोटी येणे बाकी आहे. कारखानदारांनी योजनेची वसुली रक्कम भरावी यासाठी ताकारी योजनेच्या प्रशासनाने पाठपुरवठाही केला आहे. मात्र थकीत असलेली पाणीपट्टी जमा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, वीजबिलाच्या थकीत रकमेत वाढ होईल. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. सध्या ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाईचे चित्र नाही. परंतु पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांकडून वेळेत पाणीपट्टी वसूल झाली नाही, तर थकीत असलेल्या वीजबिलापोटीची रक्कम वेळेत भरता येणार नाही. त्याचा परिणाम भविष्यात सुरू होणाऱ्या आवर्तनावर होणार आहे.

कारखान्यांकडून बिल जमा करण्यास विलंब  शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आल्यानंतर शेतकऱ्यांची बिले अदा केली जातात. त्यातूनच योजनेच्या पाणीपट्टीचे बिल कपात केले जाते. ती पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकजे वर्ग केली जाते. परंतु गतवर्षीची पाणीपट्टी कारखान्यांनी पाटबंधारे विभागाकडे वर्ग केलेली नाही. साखर कारखान्यांकडून पाणीपट्टी भरण्यास विलंब होत असल्याने वीजबिलाच्या थकबाकीत वाढ होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT