परस्पर पुर्नगठीत कर्जाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
परस्पर पुर्नगठीत कर्जाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती 
मुख्य बातम्या

परस्पर पुर्नगठीत कर्जाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

टीम अॅग्रोवन

अकोला  ः जिल्हा बँकेच्या महान शाखेंतर्गत असलेल्या सेवा सोसायटीतील शेतकऱ्यांना न विचारता कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. यामुळे कर्जमुक्तीची रक्कम कमी मिळाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील साल्पी गावातील शेतकऱ्यांनी केली असून याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील साल्पी येथील शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात लाभ मिळत असल्याचे तसेच विना सहमतीने पुनर्गठन झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नुकतेच आदेश काढत तीन सदस्यीय समितीला चौकशीचे आदेश दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महान शाखा व्यवस्थापकांनी दिशाभूल केल्याचा शेतकऱ्यांनी जो आरोप केला, त्याबाबत चौकशी करून समितीमार्फत अहवाल मागविला. या समितीचे अध्यक्ष म्हणून बार्शीटाकळी येथील सहायक निबंधक श्री. पोहरे, सदस्य म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्री. सोळंके आणि जिल्हा बँकेचे निरीक्षक एस. आर. गावंडे यांची नियुक्ती केली. या समितीने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT