In the tribal areas of Ambegaon MNREGA work will start
In the tribal areas of Ambegaon MNREGA work will start 
मुख्य बातम्या

आंबेगावच्या आदिवासी भागात मनरेगाची कामे सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण वीस गावांत मनरेगाची कामे कशी सुरू होतील. या कामात मुख्यतः रस्ते तयार करणे ही कामे केली जाणार आहे, यामुळे लोकांच्या हाताला काम मिळतानाच, आदिवासी भागातील वाड्या-वस्त्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत, अशी कामे शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली.  आदिवासी भागातील गावात मनरेगाची कामे सुरू करण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक गुरुवारी (ता. १९) आंबेगावमधील पंचायत समितीतील सभागृहात येथे पार पडली. या वेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, रोजगार हमी विभागाचे आशिष हुले, किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी व एस.एफ.आय. संघटनेचे अविनाश गवारी व रोशन पेकारी इ. सहभागी झाले होते.  किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने, मागील काही वर्षांपासून तालुक्यातील आदिवासी भागात, रोजगार हमीची सामूहिक कामे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी प्रशासनाशी संवाद साधून, तर कधी लोकशाही मार्गाने संघर्ष करून अनेक गावांत मनरेगाची सामूहिक कामे सुरू करण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतलेला आहे. नुकतीच तालुक्याच्या आदिवासी भागात, किसान सभेच्या वतीने मनरेगा हक्क-संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती, या परिषदेत तालुक्यातील आदिवासी भागातील १४ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या गावातील प्रतिनिधीनी कामाची गरज असल्याची मागणी केली होती.  या बैठकीत, ज्या गावात कामांची मागणी आहे, तेथे कोणती कामे शेल्फवर आहेत याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. वनविभागाच्या वतीने मनरेगा अंतर्गत कोणती कामे घेता येऊ शकतील याविषयी ही चर्चा या वेळी करण्यात आली. कामे सुरू करताना व कामे सुरू झाल्यानंतर कोणत्या अडचणी येतात याविषयी ही सविस्तर चर्चा होऊन, अडचणी कशा येणार नाहीत यासाठीचे नियोजन बैठकीत करण्यात आले. गावातील श्रमिकांनी आता ग्रामपंचायतमध्ये कामाची मागणी नोंदवल्यानंतर तातडीने कामे सुरू होतील असे प्रशासनाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले. प्रशासन करीत असलेल्या सहकार्याबद्दल किसान सभेच्या वतीने प्रशासनाचे व विशेषतः गटविकास अधिकारी यांचे अभिनंदनही करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT