On transfer of transfers in agriculture department 
मुख्य बातम्या

कृषी खात्यातील बदल्या लांबणीवर

ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना एक महिना काहीच हालचाल करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना एक महिना काहीच हालचाल करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने कृषीसह सर्वच खात्यातील बदल्यांना राज्य शासनाच्या एका आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे.

मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. १०) जारी केलेल्या एका आदेशानुसार, कोणत्याही पदावरील बदल्या करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. ‘‘राज्यात कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता ३० जूनपर्यंत बदलीच्या अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या करू नका. सर्वसाधारण बदल्या, अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या करू नये,’’ असे शासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गामुळे कृषी खात्यात आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ५०० पेक्षा जास्त कर्मचारी बाधित आहेत. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत धरून कामे करीत असताना दुसऱ्या बाजूला बदल्यांच्या जोरदार हालचाली काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू होत्या. बदल्यांमध्ये आर्थिक घडामोडी होत असल्याने काही घटकांसाठी बदल्यांचे पर्व सुगीचे वाटते. मात्र कोरोना स्थिती विचारात घेता प्रशासकीय बदल्या लांबणीवर टाकण्याची जोरदार मागणी सर्व संघटनांकडून वारंवार केली जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रिक्त पदे भरता येतील बदल्यांबाबत काही कारणांसाठी मात्र शासनाने सूट दिली आहे. निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरता येणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे देखील भरता येतील. याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास अशा कर्मचाऱ्याची बदली करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT