अॅग्रोवन पुरस्कार 
मुख्य बातम्या

ॲग्रोवन पुरस्कारांसाठी अंतिम मुदत उद्यापर्यंत

आनंद गाडे

पुणे : ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार उपक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण ११ गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत उद्या (ता. २५) संपत आहे.  प्रतिकूल परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कल्पकता, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आव्हानांवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने गेल्या वर्षीपासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय गौरव करण्यात येणार अाहे.  यंदा राज्य पातळीवरील ‘महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी’ या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असेल; तसेच ‘ॲग्रोवन प्रेरणा’ पुरस्कार आणि ‘ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी’ या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यासाठी आहे; तसेच ‘ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार’, ‘ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय’, ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार आहेत.  प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता  ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डस, ॲग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११00२ . ई-मेल : agrowon@esakal.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT