Three rotation during the summer season in Nanded district from 'nimna Manar'
Three rotation during the summer season in Nanded district from 'nimna Manar' 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात ‘निम्न मानार’मधून उन्हाळी हंगामात तीन आवर्तने

टीम अॅग्रोवन

नांदेड : रब्बी हंगामात काटकसरीने पाणीवापर केल्यामुळे पाण्याची बचत झाली. त्यामुळे निम्न मानार प्रकल्पाच्या डावा आणि उजवा कालव्याव्दारे यंदाच्या उन्हाळी हंगामात तीन पाणी आवर्तने सोडण्यात येतील. पहिले आवर्तन रविवार (ता. १५) पासून सोडण्यात येऊ शकते. लाभधारक शेतकरी, पाणी वापर संस्थांनी पाणी मागणी, पाणी वापराचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले. 

निम्न मानार धरण जलाशय, अधिसुचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही, मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी निम्न मानार धरणामधील रब्बी हंगाम अखेर उपलब्ध पाण्यानुसार उन्हाळी हंगामातील पहिले पाणी आवर्तन रविवारपासून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदासाठी निम्न मानार उजवा व डावा कालव्यातील तीन पाणी पाळ्या चालू होण्याचा संभाव्य तारखांप्रमाणे राहतील.

पहिले पाणी आवर्तन रविवार आणि दुसरे पाणी आवर्तन बुधवार (ता.१५ एप्रिल), तिसरे पाणी आवर्तन शुक्रवार (१५ मे ) पासून सोडण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीमध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. पाऊस, कालवाफुटी, इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल होईल. जलसंपदा विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती, अटी बंधनकारक राहतील.

शेतचारी स्वच्छ, दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा केल्यास, गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. 

उपसा सिंचनासाठी अर्ज करा 

उन्हाळी हंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात मुदतीत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. वैयक्तिक उपसा सिंचन लाभधारकांनी पाणी मोजमाप यंत्र बसवून पाणी उपसा करणे बंधनकारक आहे. काही कारणास्तव पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असे पाटबंधारे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT