संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड There will be hybrid varieties Intensive planting 
मुख्य बातम्या

संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड

सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची सधन लागवड करून उत्पादकता वाढीचे प्रयत्न आजवर झाले. या पुढील काळात संकरीत वाणांच्या माध्यमातून देखील सधन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

टीम अॅग्रोवन

 नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची सधन लागवड करून उत्पादकता वाढीचे प्रयत्न आजवर झाले. या पुढील काळात संकरीत वाणांच्या माध्यमातून देखील सधन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यात १५ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक हलक्‍या प्रतीच्या जमिनीवर कापसाची लागवड होते, अशा भागात हे प्रयोग राबविण्याचे प्रस्तावीत असून, त्याद्वारे उत्पादकता वाढीचा उद्देश साधता येईल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी गुरुवारी (ता. ७) व्यक्‍त केला.  केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था (सिरकॉट) सभागृहात कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीज, कॉटन डेव्हल्पमेंट ऍण्ड रिसर्च असोसिएशन मुंबई तसेच सिरकॉट यांच्या संयुक्‍त सहकार्याने जागतिक कापूस दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘बोंडअळीची समस्या गेल्या काही वर्षांत गंभीर होत चालली आहे. या समस्येचे प्रभावी निराकरण होण्यासाठी लवकरच सीआयसीआरद्वारे तंत्रज्ञानाची शिफारस केली जाणार आहे. त्या संदर्भातील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. तंत्रज्ञान प्रसारावर देखील येत्या काळात भर दिला जाणार असून, त्याकरीता मोबाइलचा प्रभावी वापर करण्याची योजना आहे. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे समन्वयक गोविंद वैराळे यांनी केले. रुईच्या प्रमाणात कापसाला दर मिळावा यासाठी संस्था गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा आणि जागृती करीत आहे. या मोहिमेला काही अंशी यश आल्याची माहिती त्यांनी दिली. कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीज या संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.  सेंद्रीय कापूस करेल मालामाल  जीमाटेक्‍स इंडस्ट्रीजचे संचालक प्रशांत मोहता म्हणाले, ‘‘या वर्षी कापसाचे दर सहा हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील. सद्यःस्थितीत चीन सहित अनेक देशांची सेंद्रिय कापसाला मागणी आहे. सेंद्रीय कापूस गाठीचा दर ३०० रुपये किलो राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT