दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही There is no subsidy for gram varieties above ten years
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही There is no subsidy for gram varieties above ten years 
मुख्य बातम्या

दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यंदा दहा वर्षांच्या आतील हरभरा बियाणे वाणांना प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देखील मिळेल. राज्याचे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी एका आदेशात बियाणे पुरवठ्याच्या नियोजनाबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.  ‘‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात हरभरा पिकाच्या दहा वर्षांवरील वाणांसाठी दिलेले यापूर्वीचे आर्थिक लक्ष्यांक काढून टाकावे. मात्र हेच लक्ष्यांक दहा वर्षांच्या आतील वाणांच्या वाटपासाठी वर्ग करण्यात यावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या वाणांचे प्रमाणित बियाणे मिळू शकेल,’’ अशा सूचना श्री. पाटील यांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत चालू रब्बी हंगामात महाडीबीटी संकेतस्थळावर हरभरा बियाणे मिळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फक्त दहा वर्षांच्या आतील बियाणे देण्याचे बंधन असेल. त्यासाठी संबंधित बियाणे पुरवठादारांकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा वेळेत होईल, याची दक्षता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला घ्यावी लागणार आहे.  अनुदानित बियाणे मिळवण्यास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडून गावच्या कृषी सहायकाला मिळणार आहे. कृषी सहायकाने शेतकऱ्यांना बियाणे परमीट वाटायचे असून, शेतकऱ्याने तेच परमीट संबंधित बियाणे विक्रेत्यांकडे जमा करायचे आहे. अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित पैसे शेतकऱ्याला भरावे लागेल. त्यानंतर विक्रेत्याकडून शेतकऱ्याला पैसे भरल्याची पावती आणि अनुदानित बियाणे मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्थांकडून  बियाणे घेता येणार शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे पुरेसे बियाणे नसल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संस्थांकडून बियाणे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या कंपन्यांनी तयार केलेल्या प्रमाणित बियाण्यांची तपासणी केल्याचे अहवाल बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून मिळवावेत, अशाही सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT