Telecommunication equipment started in Malegaon; Offense on five owners
Telecommunication equipment started in Malegaon; Offense on five owners 
मुख्य बातम्या

मालेगावात संचारबंदीत यंत्रमाग सुरू; पाच मालकांवर गुन्हा

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग सुरू असल्याने संबंधित यंत्रमाग मालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानिशा करण्यात आली आहे. याबाबत पाच यंत्रमाग मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आपले कार्यक्षेत्र नसतानाही त्या यंत्रमाग उद्योगात जाऊन तेथील मजुरांना मारहाण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.सद्यःस्थितीत मालेगाव येथील एकही यंत्रमाग उद्योग सुरू नसल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील काही यंत्रमाग सुरू आहेत, अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाली होती. लोकांनी असेही सांगितले की, यंत्रमाग बंद करण्याकरिता काही पोलिस तेथे आले होते. मात्र, त्या यंत्रमाग उद्योगावर कारवाई होण्याऐवजी संबंधित पोलिसांचीच बदली करण्यात आली, अशीही माहिती पसरविण्यात आली आहे. 

या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. ते पोलिस अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना दोन मजूर आढळले. त्यांनी त्या मजुरांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मालेगाव पोलिस उपअधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आपली क्षेत्र सोडून कामगारांना, मजुरांना मारहाण करण्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे. तसेच सध्या मालेगाव येथील कोणतेही यंत्रमाग सुरू नसून, पाच मालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

‘संचारबंदीचे उल्लंघन करू नये’ मालेगाव मध्ये पोलिस विभागाचे संचारबंदीत नियंत्रण असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल असे, श्री. मांढरे यांनी कळविले आहे. नागरिकांनीही आपल्या एखाद्या चुकीमुळे ‘कोरोना’चे रुग्ण वाढतील असे कोणतेही वर्तन करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT