सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट
सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन

सातारा  : जिल्ह्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत २३ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. ही वृक्ष लागवड १ ते ३१ जुलै या दरम्यान करावयाची आहे. वृक्षलागवडीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बुधवारी (ता.२०) १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी सिंघल बोलत होत्या. या वेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.

श्रीमती सिंघल म्हणाल्या, की महाराष्ट्र हरित सेना हा उपक्रम वन विभागाने सुरू केला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील ७५ हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. हरित सेनेमध्ये आणखी नोंदणी कशी वाढेल यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकर घ्यावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर १ ते ३१ जुलै या दरम्यान फळबाग लागवडीचे नियोजन करावे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झालेल्या गावांमध्ये वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घ्यावा. वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक विभागाने लागवडीचे नियोजन करावे. कार्यक्रमामध्ये गावातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वृक्षांची लागवड करावयाची आहे. या वृक्षांच्या संवर्धनासाठी उपाय योजना कराव्यात.

विद्यार्थ्यांच्या सहली जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सीसीटीची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांवर शाळेच्या सहलींचे नियोजन करून सीसीटीमध्ये विद्यार्थ्यांकडून बियाणे टाकून घ्यावीत. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबतची या वेळी माहिती द्यावी, अशी सूचनाही श्वेता सिंघल यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT