प्रादुर्भाव वाढतोय, सार्वजनिक संपर्क टाळा; कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ वर
प्रादुर्भाव वाढतोय, सार्वजनिक संपर्क टाळा; कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ वर 
मुख्य बातम्या

प्रादुर्भाव वाढतोय, सार्वजनिक संपर्क टाळा; कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ वर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूचा राज्यातील प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे अधिक सावधगिरीच्या उपाययोजना राबविण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. सर्वप्रकारचा सार्वजनिक संपर्क टाळण्याच्या सूचना सरकारने नागरिकांना दिल्या आहेत. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.  राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून, १०६२ ‘होम क्वारंटाइन’ असून, त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (ता.१७) येथे दिली. यवतमाळ येथे कोरोनाबाधित आढळलेली ५१ वर्षांची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील ‘आयटी़’ तज्ज्ञाची आई आहे. ती स्वतःही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोनाबाधित आढळले असून, २२ जण ‘निगेटिव्ह’ आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील तीन जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरातच वेगळे ठेवण्यात आले आहे.  सोमवारी कोरोनाबाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता. तो फिलिपिन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत  फिलिपिन्सहून नवी मुंबईत आलेल्या या दहा जणांच्या चमूतील तीन जण कोरोनाबाधित आढळले असून,, इतर सात जण कोरोना ‘निगेटिव्ह’ आढळले आहेत.  राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर १६६३ विमानांमधील १ लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.  राज्यात सोमवारपर्यंत बाधित भागातून एकूण १९६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. कालपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.  राज्यातील स्थिती

  • मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूरचे भवानी माता मंदिर, पुण्यातील कसबा आणि दगडूशेठ गणपती मंदिर, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आणि शेगांवमधील गजानन महाराज मंदिर बंद
  • अजिंठा, वेरुळ लेणी सात एप्रिलपर्यंत बंद
  • मंत्रालयात अभ्यागतांना बंदी
  • उझबेकीस्तानमध्ये अडकले राज्यातील ३९ डॉक्टर
  • ‘कोरोना’मुळे संत्रा दरात तेजी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT