The sun shines brighter 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

सूर्य तळपू लागल्याने उन्हाची ताप असह्य होऊ लागला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. नगर, चंद्रपूर, सांताक्रूझ, मालेगाव येथे कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : सूर्य तळपू लागल्याने उन्हाची ताप असह्य होऊ लागला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. नगर, चंद्रपूर, सांताक्रूझ, मालेगाव येथे कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. आजपासून (ता. ५) तमिळनाडूचा किनारपट्टीय भाग, पुदुच्चेरी, काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ समुद्रात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यातच महाराष्ट्रातही पावसाला पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. सोमवारपासून (ता. ७) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सातत्याने ३४ ते ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३७.४ सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.५, नगर ३७.४, धुळे ३४, जळगाव ३६, कोल्हापूर ३४.६, महाबळेश्‍वर २८.९, मालेगाव ३७, नाशिक ३४, निफाड ३२.८, सांगली ३६.१, सातारा ३४.८, सोलापूर -, सांताक्रूझ ३७.१, अलिबाग ३१.५, डहाणू ३१.४, रत्नागिरी ३४, औरंगाबाद ३४.२, नांदेड ३२.८, परभणी ३५.७, अकोला ३६.६, अमरावती ३४.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३५.४, चंद्रपूर ३७, गडचिरोली ३५, गोंदिया ३०.८, नागपूर ३३.८, वर्धा ३५, यवतमाळ ३५.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :   नगर ३७.४,  सांताक्रूझ ३७.१,  मालेगाव ३७,  चंद्रपूर ३७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

Parbhani Water Scarcity: चार लघू सिंचन तलाव आटले

Fertilizer Booking App : ऑनलाइन खत बुकिंगसाठी केंद्र सरकारचा निर्णय

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT