आरेगाव, जि. यवतमाळ : येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता पुसद तालुक्यात सोयाबीनचे बियाणे घरी राखून ठेवण्या बरोबरच पुढील हंगामात पेरणी करिता उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पुसद तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे.
कृषी विभागामार्फत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पेरणी करिता चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे राखून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र रिकामे आहे व सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पेरणी करिता प्रोत्साहित करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून तीन कृषी मंडळात सुमारे पन्नास ते पंचावन्न हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. यामुळे येत्या खरीप हंगामात बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची पायपीट होणार नाही.
शेंबाळपिंपरी कृषी मंडळात पंधरा हेक्टरपर्यंत सोयाबीन पेरणी झाली असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी नीलेश राठोड यांनी बोलताना सांगितले.
तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ग्रामबिजोत्पादन मोहिमेच्या माध्यमातून सोयाबीन बियाण्यांच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरीही याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.