Summer crops flourish in Khandesh
Summer crops flourish in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात उन्हाळी पिके जोमात

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. परंतु लॉकडाउन व कोरोनाच्या समस्येची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

कांदा पिकाची लागवडही खानदेशात स्थिर होती. कांद्याची प्रतिकिलो साडेतीन हजार, चार हजार रुपये दराचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून लागवड केली होती. खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. यात अनेक भागात म्हणजेच धुळे, साक्री, चोपडा आदी तालुक्यात कांद्याची काढणी सुरू झाली आहे. परंतु कांदा पिकाचे दर कोरोनाच्या समस्येमुळे गेल्या १८ ते २० दिवसांत सतत कमी झाले आहेत. यामुळे कांदा उत्पादकांना पीक परवडणार नाही, अशी स्थिती तयार झाली आहे.

दुसरीकडे बाजरी पिकाची पेरणीदेखील स्थिर आहे. बाजरीला गेल्या वर्षी किमान १५०० व कमाल २०५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला होता. पण यंदा मळणीपूर्वीच लॉकडाउन व बाजार व्यवस्थेला फटका बसू लागल्याने बाजरीचे दरही दबावात येत आहेत. सध्या आवक फक्त व्यापाऱ्यांकडून होत आहे, पण दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

भुईमुगालाही गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे फटका बसला होता. गेल्या वर्षी वाळविलेल्या भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर होता. यंदा किमान सात हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण बाजार समित्यासह पणन व्यवस्थेने गती, सुसूत्रता धरली होती. परंतु लॉकडाउनच्या भीतीने या शेंगांचा हंगामही नफा देणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी पिकांमध्ये खानदेशात बाजरी अधिक असायची. पण यंदा भुईमूग, तीळ पिकाची पेरणी चांगली आहे. तापी, गिरणा, पांझरा नदीकाठच्या भागात हे पीक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT