राहुरी, जि. नगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी नगर- मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
राहुरी, जि. नगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी नगर- मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. 
मुख्य बातम्या

ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

राहुरी, जि. नगर : ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) नगर- मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसांत निर्णय न घेतला गेल्यास पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनात दिला गेला.

याबाबत निवासी नायब तहसीलदार सी. जी. तळेकर व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना आंदोलकांनी निवेदन दिले. सकाळी राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नगर- मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले.

या वेळी बोलताना श्री. मोरे म्हणाले, की नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. मात्र, कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही, त्यामुळे ऊस उत्पादक संभ्रमावस्थेत आहेत. नेमका किती भाव देणार हे समजले पाहिजे.

वाढलेला खर्च लक्षात घेता सर्व कारखान्यांनी त्वरित प्रतिटन ३४०० रुपये भाव जाहीर करावा. तसेच, उसाचे वजन कमी येत असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याने कारखान्यांनी वजन व त्यापोटी मिळणारे पेमेंट ऑनलाइन करावे. ऊसतोड झाल्यापासून १५ दिवसांत पेमेंटची सर्व रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करावी. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी प्रकाश देठे, दिनेश वराळे, अरुण डौले, सुमीत इंगळे, देवेंद्र लांबे यांचे भाषण झाले. या आंदोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या आंंदोलनात सुभाष वने, संग्राम धुमाळ, किशोर भिंगारकर, प्रवीण पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, सचिन म्हसे, सचिन पवळे, प्रशांत पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, भगीरथ पवार आदी सहभागी झाले होते. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात का दर नाही? गुजरातमध्ये उसाला ४७०० रुपये, उत्तर प्रदेशमध्ये ३५०० रुपये प्रतिटन भाव दिला जातो, मग महाराष्ट्रात त्याप्रमाणे भाव का मिळत नाही, असा खडा सवाल आंदोलकांनी या वेळी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT