संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणार

टीम अॅग्रोवन

पुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा लवकर म्हणजे फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, की आर्थिक क्षमता घटल्याने अतिशय नाजूक स्थितीतून कारखाने जात आहेत. दुष्काळामुळे हंगाम रेटत नेत १५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान गाळप संपविण्याचे नियोजन मराठवाड्यातील कारखान्यांचे आहे. १ ते १५ मार्चच्या दरम्यान सोलापूर आणि नगर भागातील हंगाम संपेल. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक कारखाने मार्चअखेर बंद होतील. राज्यात यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन घटण्याचा साखर उद्योगाचा अंदाज आहे. ‘‘गेल्या हंगामात राज्यात १०७ लाख टन साखर  तयार झाली. यंदा उत्पादन १७ लाख टनांनी घटून ९० लाख टनाच्या आसपास राहिल. देशाचे उत्पादन देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत २५ लाख टनांनी घटून ३०० लाख टनांच्या आसपास राहील,’’ असे श्री.ठोंबरे यांनी स्पष्ट केले. 

‘‘अतिरिक्त साखरेचा साठा असूनही निर्यातीसाठी राज्य शासन अजिबात पुढे येण्यास तयार नाही. राज्य सरकार केवळ घोषणाबाजी करते. प्रत्यक्षात उद्योगाला मदत करीत नाही. त्यामुळेच शेतकरी आणि कारखाने अडचणीत आहेत,’’ असे मत श्री. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, की दुष्काळामुळे राज्याचे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील. कारखाने देखील लवकर बंद होतील. टॅंकरने पाणी आणून मराठवाड्यात काही ठिकाणी गाळप पूर्ण करण्याचे काम कारखाने करीत आहेत. फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील कारखाने एकापाठोपाठ बंद होत जातील. एका बाजूला दुष्काळाचा फटका व दुस-या बाजूला एफआरपीची समस्या अशा दुहेरी कात्रीत कारखाने आहेत. साखर निर्यातीसाठी राज्य सरकारने पुढाकार न घेतल्याबद्दल सहकारी कारखान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘केंद्राकडून एक हजार रुपये व राज्याकडून २०० रुपये प्रतिक्विंटल मदत मिळाल्यास जादा साखर साठ्यांची समस्या दूर होईल. जवळच्या आशियाई देशांना साखर निर्यात झाल्यास साठे कमी होतील. मात्र, त्यासाठी गप्प बसलेल्या राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल,’’ असेही श्री.दांडेगावकर यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT