Sugarcane cultivation likely to increase in Khandesh
Sugarcane cultivation likely to increase in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

जळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर पिकांमधील खर्च, मजुरी, नुकसान आदी समस्या लक्षात घेता खानदेशात या हंगामात ऊस लागवड सुमारे पाच हजार हेक्टरने वाढू शकते. ही लागवड शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यात अधिक वाढेल, असाही अंदाज आहे. 

खानदेशात सुमारे २६ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. त्यात नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर, धुळ्यात सहा आणि जळगाव जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती.

खानदेशात गेल्या तीन वर्षांत तीन खासगी कारखाने सुरू झाले आहेत. यातील समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील कारखाना वेगात काम करीत आहे. या कारखान्याने गाळप क्षमता आठ हजार टन प्रतिदिनपर्यंत नेण्याची कार्यवाही यंदा हाती घेतली. १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. 

नंदुरबारात मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानेदेखील ऊस खरेदी करतात. तर धुळे व जळगावातही दोन खासगी कारखाने कार्यरत आहेत. मधुकर सहकारी साखर कारखाना (न्हावी., जि.जळगाव) अडचणीत आहे. तसेच चोपडा (जि.जळगाव) येथील कारखानादेखील बंद आहे. या स्थितीत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खासगी कारखाना व जळगाव येथील खासगी कारखाना कार्यरत आहे. तसेच औरंगाबाद, नाशिक व नगर जिल्ह्यातील कारखानेदेखील खरेदी करीत आहेत. यामुळे उसाची १०० टक्के तोडणी पूर्ण होते. चुकारेही गेल्या हंगामात मिळाले. 

चाळीसगाव तालुक्यातही क्षेत्र वाढणार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ऊस लागवड वाढणार आहे. यंदा या तालुक्यात व लगत पाच ते सहा हजार हेक्टरवर ऊस लागवड होईल. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टरवर ऊस लागवड होऊ शकते. धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल व मुक्ताईनगर भागातही ऊस लागवड वाढण्याचा अंदाज आहे. ही लागवड खानदेशात मिळून ३० ते ३१ हजार हेक्टरपर्यंत पोचू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT