संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर उत्पादन

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, रविवारी (ता. १०) पहाटेपर्यंत या १४ कारखान्यांमधून एकूण २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत १९ लाख ५१ हजार ८१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३९ टक्के साखर उतारा येत आहे.

जिल्ह्यात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक दोन लाख ९० हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ३५ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सह्याद्री कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.५३ टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक जयवंत शुगरचा लागत असून, या कारखान्यांचा ११.२१ सरासरी साखर उतारा येत आहे.

जिल्ह्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा, जयवंत, ग्रीन पॉवर, श्रीराम व न्यू फलटण या कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. उर्वरित कारखान्यांचा गाळप सुरू महिना उलटला असूनही ऊस बिले जमा जाहीर केलेले नाही. यामुळे या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यात अवस्थता निर्माण झाली आहे.

उद्दिष्टासाठी साखर उताऱ्यांकडे दुर्लक्ष ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची गाळपाची उद्दिष्टे ठरवून हंगामास सुरवात केली आहे. मागील हंगामात मोजक्‍याच कारखान्यांनी तीन हजार टप्पा ओलांडला आहे. मागील हंगामात कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देणास शेतकरी अनुत्सुक आहेत. यामुळे हे कारखाने उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणत आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर होत असून, साखर उतारा कमी येत आहे. साखर उताऱ्यांची ही अवस्था राहिल्यास पर्यायाने कारखान्यांचा दर कमी होणार आहे. याचा परिणाम प्रामाणिक ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT