Of sugar factories In the final stages of the season 
मुख्य बातम्या

साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे ः जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत जिल्ह्यातील साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर मजूर परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. 

वाढता उन्हाचा चटका, वाढती पाणी टंचाई, जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची स्थिती आदींमुळे एप्रिलपासून साखर कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. यंदा हंगामात सुमारे १७ साखर कारखाने सुरू झाले. त्यात सहकारी अकरा व खासगी सहा साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता अडीच ते आठ हजार मेट्रिक टन आहे. अजून एक ते दीड महिना साखर कारखाने चालतील, अशी शक्यता आहे. मात्र राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. 

एक कोटी २७ लाख मेट्रिक टन ऊसगाळप

जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एक कोटी २७ लाख २० हजार ३५९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी एक कोटी ३३ लाख १२ हजार ९२५ क्विटंल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा १०.४७ टक्के आहे. यात सहकारी साखर कारखान्यांनी ७९ लाख २२ हजार १४४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ८४ लाख ३५ हजार ४३० क्विटंल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा १०.६५ टक्के आहे.

खासगी कारखान्यांनी ४७ लाख ९८ हजार २१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ४८ लाख ७७ हजार ४९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा १०.१७ टक्के निघाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT