स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे
स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे 
मुख्य बातम्या

स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे : मंत्री खोत

टीम अॅग्रोवन

मुंबई : महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठा(राहुरी)ने तयार केला असून, तो शासनाच्या मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रामुळे दोन उच्च प्रतीच्या प्रजातींमध्ये संकर करून गोड व मोठ्या आकाराच्या फळांचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करता येणार आहे. नवीन वाण प्रसारित करताना रोग व कीड प्रतिबंधक राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जातींपेक्षा घट्ट फळांच्या जाती मिळतील. स्ट्रॉबेरी फळाची साठवणूक व प्रक्रिया यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक रखडलेले हे केंद्र मार्गी लावण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या बैठकीला फलोत्पादन सहसंचालक जमदाडे, सातारा कृषी अधीक्षक बोरकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख तसेच कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते. स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन योजनेंतर्गत खर्चाच्या ५० टक्के किंवा ५०,००० रुपये अनुदान देण्यात येत होते. त्याच धर्तीवर २०० हेक्टर क्षेत्रावरील ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खोत यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT