Stop the way by Swabhimani in Solapur 
मुख्य बातम्या

सोलापुरात ‘स्वाभिमानी’चे ‘रास्ता रोको’

टीम ॲग्रोवन

सोलापूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि आसीईपी करारातून शेतीमाल व दुग्धजन्य पदार्थ वगळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ८) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन रण्यात आले. 

देशभरात २६५ शेतकरी संघटनांनी ग्रामीण भारत बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला जिल्ह्यात सगळीकडेच प्रतिसाद मिळाला. संघटनेच्या वतीने तुंगत, लऊळ, रिधोरे आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. तुंगत येथे सोलापूर-पंढरपूर मार्गावर सकाळी दहा वाजता आंदोलन झाले. 

रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. तासाभरानंतर वातावरण निवळले. या वेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, सरपंच आगतराव रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना विजय रणदिवे यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांवर सूड उगवण्याचा हा डाव आहे, असे ते म्हणाले. या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार तिटकारे आणि पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना निवेदन देण्यात आले. 

आंदोलनातील मागण्या 

  • आरसीईपी करारातून शेतीमाल व दुग्धजन्य पदार्थ वगळण्यात यावेत
  • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा
  • वीजबिल माफ करावे व शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळावी
  • राज्य महामार्ग ९६५ आळंदी ते मोहोळ रस्त्यासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा
  • २०१८-२०१९ ची थकीत ऊसबिले त्वरित मिळावीत
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

    Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

    Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

    Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

    India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

    SCROLL FOR NEXT