जालना, औरंगाबादमध्ये  ‘स्वाभिमानी’चा ‘रास्ता रोको’
जालना, औरंगाबादमध्ये ‘स्वाभिमानी’चा ‘रास्ता रोको’ 
मुख्य बातम्या

जालना, औरंगाबादमध्ये ‘स्वाभिमानी’चा ‘रास्ता रोको’

टीम ॲग्रोवन

सिल्लोड/ वडीगोद्री : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला. त्याअंतर्गत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री व औरंगाबाद जिल्ह्यांतील सिल्लोड तालुक्‍यात गोळेगाव येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आले. 

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर बुधवारी (ता. ८) रास्ता रोको करण्यात आले. सकाळी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. गणेश गावडे, ताराचंद पवार, बंडू मैंद, अंकुश तारक, डिगांबर तारक, भगवान बर्वे, पांडुरंग गटकळ, पांडुरंग गावडे, बप्पासाहेब काळे, नारायण डहाळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यातील गोळेगाव येथेही शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. जवळपास दीड तास  औरंगाबाद-जळगाव मार्ग अडविण्यात आला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, पूजा मोरे, गजानन बंगाळे, सुनील सनान्से, युवराज वराडे, विलास लहाने, संदीप साळवे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. 

...अशा आहेत मागण्या

प्रादेशिक व्यापक अर्थिक भागीदारी (RCEP) करारावर भारत सरकारने स्वाक्षरी करू नये, अतिवृष्टीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान होऊनही अनुदानातून वगळण्यात आले. त्यांना हेक्‍टरी १८ हजार रुपये अनुदान द्यावे. विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे. शेती पंपास २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, पीकविम्याचे पैसे १५ दिवसांच्या आत द्यावे आदी मागण्या करण्यात  आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT