शेततळी स्थिती
शेततळी स्थिती 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ६३३० शेततळ्यांची कामे पूर्ण

Suryakant Netke
नगर  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून आतापर्यंत ६३३० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय सध्या ५२० कामे सुरू आहेत. ५९०६ शेतकऱ्यांचे अनुदान थेट त्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले असून, सर्व बाबींवर १४ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपये खर्च झाला आहे. योजनेतून लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाकडे २८ हजार ८६४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. 
शेतकऱ्यांना कमी पाण्यात भरघोस पीक उत्पादन घेता यावे, यासाठी राज्य सरकार दीड वर्षांपासून मागेल त्याला शेततळे योजना राबवत आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविले जात असून, त्याला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये ९२०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत २८ हजार ८६४ शेतकऱ्यांनी या योजनेतून शेततळ्याचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ६३३० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील ५९०६ शेतकऱ्यांना त्यांच्या थेट खात्यावर अनुदान वितरित केले आहे. अनुदानासह अन्य बाबींवर आतापर्यंत १४ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपये खर्च झाले आहेत. शेततळ्यांची कामे पूर्ण केलेले अजून ४२४ शेतकरी अनुदानाला प्रात्र आहेत.
मागेल त्याला शेततळे योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यामुळे संरक्षित शेती करण्याला मदत होत आहे. कमी पाण्यात चांगले पीक उत्पादन घेण्याचा शेतकरी यशस्वी प्रयत्न करत आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले. राज्यात सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून प्राप्त झाले असून, कामेही सर्वाधिक पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
तालुकानिहाय पूर्ण कामे (कंसात दाखल प्रस्ताव) ः नगर ५५२ (१६८९), पारनेर ३९१ (१९१२), पाथर्डी ३४५ (१७५५), जामखेड १८५ (५२०), श्रीगोंदे ६१० (३८५९), कर्जत १०८० (२४३५), नेवासे २४७ (२८९९), श्रीरामपूर ३०७ (११२७), शेवगाव १३२ (८०१), राहुरी १७६ (८९४), संगमनेर ८२८ (४१८१), राहाता ३९८ (१९६२), कोपरगाव ४५० (२३१५), अकोले ६२९ (२५१५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT