परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची दिलगिरी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची दिलगिरी 
मुख्य बातम्या

परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची दिलगिरी

टीम अॅग्रोवन

मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विधान परिषदेत सोमवारी (ता.१९) पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. मात्र, सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. गायकवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला गेला नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने याबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. स्व. वाजपेयींनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला, त्याचप्रमाणे त्यांनी पक्षवाढीसाठी कठोर मेहनत घेतली आणि पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले, अशा शब्दांत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधान परिषद सदस्य उमेशा पवार यांनाही चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही वाजपेयी यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे माधवराव गायकवाड आणि उमेशा पवार यांच्या निधनाबद्दल मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. महादेव जानकर, भाई गिरकर, जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे, बाबजानी दुर्राणी, मनीषा कायंदे, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा आणि अरुण अडसद या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला करून दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT