anil bonde
anil bonde 
मुख्य बातम्या

केंद्राच्या सन्मान योजनेला राज्य सरकारकडून आडकाठी 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी देत दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना मिळणारा हा दोन हजार रुपयांचा निधी खात्यात जमा होण्यास आडकाठी आणल्याचा आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वळता करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रक्रिया करुन देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले. परंतू काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पडताळणी केली असता राज्य सरकारने निधी थांबविल्याचा संदेश पोर्टलवर दिसत आहे. 

याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर कैलाससिंग राजपूत या शेतकऱ्याचे पोर्टलवरील ऑनलाईन कारवाईची माहिती घेण्यात आली. त्यावेळी देखील राज्य सरकारकडून पैसे रोखण्यात आल्याचा मॅसेज डिस्प्ले झाला, असे डॉ. बोंडे यांनी सांगीतले. या संदर्भाने कृषी आयुक्‍तांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उपाययोजना सुरु असल्याचे सांगण्यात आले, असेही डॉ. बोंडे म्हणाले.  अमरावतीत वीस हजार शेतकरी वंचित  अमरावती जिल्हयात वीस हजारावर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा निधी मिळाला नाही. अमरावती जिल्हा बॅंकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे, त्याच ठिकाणी ही अडचण निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्हयातही अशाप्रकारची समस्या निर्माण झाल्याचा दावा डॉ. बोंडे यांचा आहे. दरम्यान या संदर्भाने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT