द्राक्षमणी खरेदीत रास्त दर मिळण्यासाठी खरेदी केंद्र सुरू
द्राक्षमणी खरेदीत रास्त दर मिळण्यासाठी खरेदी केंद्र सुरू  
मुख्य बातम्या

द्राक्षमणी खरेदीत रास्त दर मिळण्यासाठी खरेदी केंद्र सुरू

टीम अॅग्रोवन

नाशिक  : निफाड तालुक्यात व परिसरात द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष उत्पादकांची पॅकिंगनंतर उरणाऱ्या द्राक्षमण्यांची विक्री व्यवस्था व्हावी यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने निफाड तालुक्यातील उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्राची सुरुवात सोमवार(ता. ३)पासून झाली असून, उघड पद्धतीने द्राक्षमणी लिलाव सुरू झाले आहेत.  द्राक्ष उत्पादक पतिंगराव ढोमसे यांच्या मालाचा पहिला लिलाव झाला, त्यास प्रतिकिलो २२ रुपये दर मिळाला. २००४ पासून उगाव येथे द्राक्षमणी खरेदी केंद्र सुरू झाले आहे. द्राक्ष उत्पादक, अडते व व्यापारी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमण्यांचा लिलाव सुरू झाला. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मोतीराम मोगल, नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे यांसह उगाव व परिसरातील सोसायटी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी, द्राक्ष उत्पादक, व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.  नाशिक जिल्हात अनेक व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तसेच जे काही व्यवहार होतात, त्यामध्ये व्यवहारात थेट स्पर्धा नसल्याने दर कमी मिळण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत फसवणूक टाळण्यासाठी तसेच व्यवहारात स्पर्धा तयार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून १७ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. द्राक्ष उत्पादकांनी माल केंद्रावर विक्री करावा व इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT