पंढरपुरात होणार एसटीचे यात्री निवास
पंढरपुरात होणार एसटीचे यात्री निवास 
मुख्य बातम्या

पंढरपुरात होणार एसटीचे यात्री निवास

टीम अॅग्रोवन

सोलापूर : पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, या हेतूने एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवास आणि नवे बस स्थानक उभारण्यात येणार आहे. रविवारी (ता. ३) त्याचे भूमिपजून संतांच्या वंशजांच्या हस्ते होणार आहे.

पंढरपूर येथे सकाळी दहा वाजता चंद्रभागा मैदानावर संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील ३५५ तालुक्यांतून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीची बैठक मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात नुकतीच घेण्यात आली. त्या वेळी रावते म्हणाले, ‘‘समर्पणाचा संस्कार शिकविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या साक्षीने विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या यात्रीनिवास व बसस्थानकाचे भूमिपूजन संतांच्या वंशजांच्या हस्ते व्हावे, हा माउलीचा आदेश होता. आम्ही शासनकर्ते निमित्तमात्र आहोत.’’

यात्री निवासाच्या निर्मितीमुळे यात्रा आणि वारीच्या काळात एसटीच्या चालक वाहकांची गैरसोय दूर होईल. इतर दिवशी प्रवाशांना हक्काच्या निवासाची सोय होणार आहे, असेही रावते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT