Spontaneous response of consumers to the purchase of legumes in Aurangabad 
मुख्य बातम्या

औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांनी सर्वांनाच रानभाज्या महोत्सवात भुरळ घातली. जवळपास ५७ प्रकारच्या भाज्या या महोत्सवात सहभागी झाल्या. तर जवळपास २० स्टॉल वरून त्यांची थेट ग्राहकांना विक्री झाली.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांनी सर्वांनाच रानभाज्या महोत्सवात भुरळ घातली. जवळपास ५७ प्रकारच्या भाज्या या महोत्सवात सहभागी झाल्या. तर जवळपास २० स्टॉल वरून त्यांची थेट ग्राहकांना विक्री झाली.

सर्वांना या रानभाज्यांची ओळख व्हावी. त्याची पाककृती नवीन पिढीला कळावी, रानभाज्यांच्या विक्रीस चालना मिळावी. तसेच ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने कृषी विभाग आत्मा व कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व गांधीली यांच्या संयुक्त विद्यमाने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन औरंगाबाद येथे रविवारी (ता. ९) करण्यात आले होते. करटोली, घोळ, अंबुशी, कुर्डू, केना, सुरण, दिंडा, कुडा, टाकळा, पाथ्री, भुई आवळी, कपाळफोडी, तरोटा आगडा, उंबर, चिगूर, सराटे मयाळू, फांद, तांदुळकुंदरा, राणकेळी आदींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत स्थानिक पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित या महोत्सवातून ४० हजारांच्या रानभाज्या विकल्या गेल्या. ग्राहकांचा या भाजी खरेदीला अपेक्षेच्या पुढे जाऊन प्रतिसाद मिळाला.

विभागीय कृषी सहसंचालक डाॅ. डी. एल. जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहयोगी संचालक संशोधन डाॅ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डाॅ. किशोर झाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाॅ. तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हदगावकर, प्रबोध चव्हाण, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर आदींची प्रामुख्याने  उपस्थिती होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

उदघाटक डाॅ. जाधव म्हणाले, की ९ ऑगस्ट हा दिवस संयुक्त राष्ट्र महासंघाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिनाचे निमित्य साधत रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना राबविण्याचे या वर्षी पासून धोरण ठरवले आहे. त्या निमित्ताने या रानभाज्या महोत्सवाचे नियोजन केले आहे. आत्ताच्या पिढीला ना या भाज्यांची ओळख ना त्यापासून भाजी कशी बनवायची याचीही माहिती. त्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आला. वेगवेगळ्या रानभाज्या पाहण्याची व खरेदी करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आला. फेसबुक व युट्यूबवर हा महोत्सव दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजीव साठे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT