नांदेड जिल्ह्यात एक लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीन
नांदेड जिल्ह्यात एक लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीन  
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात एक लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीन

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. ९) ३ लाख ३९ हजार ३३३ हेक्टरवर (४१.१४ टक्के) खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात सोयाबीन १ लाख ४० हजार १७७ हेक्टर, कपाशी १ लाख ३८ हजार ६७३ हेक्टर, तर १९ हजार २४६ हेक्टर तुरीचा समावेश आहे. नियोजित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत मुखेड तालुक्यात सर्वात कमी, तर बिलोली तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा ८ लाख २४ हजार ८२० हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. पावसाअभावी अजूनही अनेक मंडळातील पेरण्या रखडलेल्या आहेत. मंगळवारपर्यंत ३ लाख ३९ हजार ३३३ हेक्टरवर (६.११ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची एकूण ७ हजार ३३७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामध्ये भात २३३ हेक्टर (५.५६ टक्के), ज्वारी ६ हजार ७५१ हेक्टर (६.०१ टक्के), मका ३५५ हेक्टर (३५.५३ टक्के) आहे.

कडधान्यांची ५३ हजार १३२ हेक्टरवर (३४.४९ टक्के) पेरणी झाली. त्यामध्ये तूर २९ हजार २४६ हेक्टर (४१.८४ टक्के), मूग १२ हजार ४७१ हेक्टर (४१.६४ टक्के), उडीद ११ हजार १३१ हेक्टरवर (२२.११ टक्के) आहे. गळितधान्य पिकांची १ लाख ४० हजार १९१ हेक्टरवर ((७०.४१ टक्के) पेरणी झाली. यामध्ये सोयाबीन १ लाख ४० हजार १७७ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, कारळ १ हेक्टर आहे. कपाशीची १ लाख ३८ हजार ६७३ हेक्टरवर (४२.८३ टक्के) लागवड झाली. 

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र  

तालुका क्षेत्र (हेक्टर)  टक्केवारी
नांदेड ११ हजार ८७७ ३७.११ 
अर्धापूर ६ हजार १२२   २५.९७
मुदखेड   ९ हजार २०२  ३८.९७ 
हदगाव ३१ हजार ९३० ३८.१७
माहूर ३१ हजार ४९३ ५१.६७
किनवट ४३ हजार ३७७  ५२.६७
हिमायतनगर  २४ हजार ५० ६३.५८
भोकर १८ हजार ७२० २८.४३
उमरी  २२ हजार ४१७ ७५.७०
धर्माबाद २८ हजार २६२ ९१.०५
नायगाव २ हजार २९२ ४.८२
बिलोली  ३७ हजार २६१ ११२.७१
देगलूर  २७ हजार २०३ ५९.९७
मुखेड ९९९  १.२९
कंधार २१ हजार ९७० ३३.८४
लोहा २२ हजार १५७ २५.४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT