सोयाबीन
सोयाबीन 
मुख्य बातम्या

आंतरपीकातील सोयाबीन नियमाच्या कचाट्यात

Abhijeet Dake

सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रिसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबाराची अट घातली आहे; मात्र मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची नोंद सातबारावर होत नाही. केवळ मुख्य पिकाचीच नोंद होते. त्यामुळे ऊस पिकात आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनची सातबारावर नोंद नसल्याने नियमाच्या कचाट्यात सापडून हमीभावाने विकणे कठीण झाले आहे.    शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली; मात्र पिकाची नोंद असलेला सातबारा असणे आवश्‍यक असा जाचक नियम लागू केला. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जून, जुलै महिन्यात आडसाली ऊसाची लागवड केली जाते. त्यानंतर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि सातबारावर पिकाची नोंद करण्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते. शेतकरी तलाठी कार्यालयात ऊस व सोयाबीन पिकाची नोंद करण्यासाठी जातात त्या वेळी सोयाबीन आंतरपीक असेल तर त्याची नोंद होणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे सातबारावर केवळ ऊस पिकाची नोंद होते, असा नियम असल्याचे तलाठी सांगतात. आता सोयाबीनची विक्री कशी करणार? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.  दोन जिल्ह्यांत दोन नियम याबाबत तलाठी यांच्याशी संपर्क केला असता, अहिरेवाडी (ता. वाळवा) येथील तलाठी म्हणाले, शेतकऱ्यांनी उसात सोयाबीन हे आंतरपीक घेतले असले तरी सातबारावर केवळ ऊस पिकाची नोंद केली जाते. सातारा जिल्ह्यातील तलाठी म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेतले असेल तर त्याची नोंद केली जाते. एका जिल्ह्यात नोंद होते, तर दुसऱ्या जिल्ह्यात सातबारावर नोंद होत नाही; मात्र तलाठ्यांच्या चुकीचा फटाक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पीकपाहणी नोंद कार्यालयातच बसून ऑगस्ट महिन्यापासून पिकाची नोंद करण्यास सुरवात होते. तलाठ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, असा नियम आहे; मात्र तलाठी शेतातच जात नाही. शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती अंदाजे घेऊन कार्यालयातच पिकाची नोंद केली जाते. यामुळे सातबारात किती टक्के पिकांची नोंद खरी असते, असाही प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रतिक्रिया आडसाली ऊस पिकात सोयाबीन आंतरपीक घेतले होते; मात्र सातबारावर या पिकाची नोंद केली नसल्याने शासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्रीसाठी घेऊन जाता आले नाही. - विलास पाटील, काले, जि. सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT