हिंगोलीत साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी
हिंगोलीत साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी 
मुख्य बातम्या

हिंगोलीत साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

हिंगोली : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवारपर्यंत (ता.२४) ३ लाख ६७ हजार ६८३ हेक्टरवर (९१.६३ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. २ लाख ५० हजार ३०७  हेक्टरवर (१२१.७४ टक्के) पेरणी झाली आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये ४ लाख १ हजार २८८ हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र गृहित धरण्यात आले. बुधवारपर्यंत ३ लाख ६७ हजार ६८३ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख  ५ हजार ६१३ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख ५० हजार ३०७ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ९२२ हेक्टर आहे. त्यापैकी ५० हजार ४९४ हेक्टरवर पेरणी झाली. 

मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार १३३ हेक्टर आहे. त्यापैकी आजवर ७ हजार १०५ हेक्टर (४१.४७ टक्के), उडदाचे १६ हजार २४५ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ३७७ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली  आहे. तिचे सर्वसाधारण क्षेत्र ४० हजार ६२७ हेक्टर आहे. त्यापैकी ५ हजार १०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ८० हजार ६३१ हेक्टर आहे. त्यापैकी ४७ हजार ११ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. हळदीची ३२ हजार ५३४ हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती मिळाली.

 तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
हिंगोली ७७८१६ ७७१८  ९९.१९
कळमनुरी  ७५०७७ ६९४१८ ९२.४६
वसमत  ७८९४०  ६३९६०   ८१.०२
औंढानागनाथ  ७६९०१ ६९४५२ ९०.३१
सेनगाव  ९२५५४ ८७६६५ ९४.७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT