म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत सौरदिव्यांचा प्रकाश 
म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत सौरदिव्यांचा प्रकाश  
मुख्य बातम्या

म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत सौरदिव्यांचा प्रकाश 

टीम अॅग्रोवन

म्हसवड, जि. सातारा : भीषण दुष्काळामुळे चारा व पाणीटंचाईने त्रस्त झालेली शेतकरी कुटुंबे जनावरांसोबत चारा छावणीत झोपड्या उभारून रात्रीच्या अंधारात मुक्कामी राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोदरेज कंपनीने प्रत्येक कुटुंब अर्थात झोपडीत सोलर एलईडी दिवा मोफत दिल्यामुळे छावणीतील झोपड्या प्रकाशाने उजळून निघाल्या आहेत. 

बजाज कंपनी व बृहद भारती समाजाच्या आर्थिक योगदानातून येथील माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत सुमारे आठ हजार जनावरे व त्यासोबत ६४ गावांतील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबे झोपड्या उभारून मुक्कामी राहिलेल्या कुटुंबांना गोदरेज आग्रोव्हेट, पुणे या कंपनीने प्रत्येकी दीड हजार रुपये किमतीच्या आधुनिक सौर ऊर्जेवरील एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘‘शासनाकडून जनावरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्‍यता नसल्याचे पाहून माण देशी फाउंडेशनच्या माध्यमाने राज्यात पहिली जनावरांची चारा छावणी एक जानेवारीपासून सुरू केली. छावणीत जनावरांनासह सुमारे तीन हजार कुटुंबे मुलाबाळांसह छावणीत झोपडी उभारून मुक्कामी आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने या झोपड्यांना आग लागू नये, यासाठी रॉकेलचे दिवे व कंदील लावण्यास मनाई करावी लागली. मुक्कामी राहिलेल्या कुटुंबांना मनाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी काळ्याकुठ्ठ अंधाररात्री सर्प, विंचूपासून ते कसे सुरक्षित राहू शकतील याची चिंता भेडसावत होती. या समस्येचे निवारण करण्यासाठी गोदरेज कंपनीने प्रत्येक शेतकरी कुटुंबास सौर ऊर्जेवर एलईडी दिवे रात्रभर प्रकाशित राहू शकतील व प्रत्येक कुटुंबाची मोबाईल बॅटरी चार्ज करू शकतील, अशी सुविधा असलेले सौर ऊर्जा स्वचलित दिवे उपलब्ध करून देण्यास गजुभाई व्होरा यांच्या कुटुंबाने पुढाकार घेतला व ते मिळवूनही दिले. त्याबद्दल व्होरा कुटुंब व गोदरेज कंपनीचे शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानते.’’

या वेळी गजुभाई व्होरा यांनी सौर ऊर्जेवरील एलईडी दिव्याची बॅटरी सूर्यप्रकाशात सौर पॅनेलद्वारे चार्ज कशी करावी, मोबाईल चार्ज करण्याची सुविधा याबाबतची माहिती शेतकरी कुटुंबांना दिली. या वेळी गोदरेज आग्रोव्हेटचे डिलर व सपना मार्केटिंगचे संचालक रुपेश व्होरा, गजुभाई व्होरा, परवेश व्होरा, अजितकुमार व्होरा, विजय सिन्हा, माण देशी फाउंडेशनचे विश्वस्त रवींद्र वीरकर, माण देशी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा वनिता पिसे इत्यादी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT