Solapur Forest Department will cultivate grass 
मुख्य बातम्या

सोलापूर वनविभाग करणार चक्क गवताची शेती

सोलापूर ः वन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १२ लाख रोपेही तयार करण्यात आली असून, ती लागवड करण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः वन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १२ लाख रोपेही तयार करण्यात आली असून, ती लागवड करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने चाऱ्याच्या उपलब्धेतबरोबर जमिनीची धूप रोखणे आणि भूजल पातळी वाढवणे, हा उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात आले.   

सोलापूर जिल्हा माळरानासाठी प्रसिद्ध आहे. ही ओळख अधिक दृढ व्हावी, माळरानाची परिस्थिती विकसित व्हावी, यासाठी पालकमंत्री आणि राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी अॅग्रोवनलासांगितले.

जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर माळरान आहे. या भागातील वन विभागाच्या मुरमाड, रेताड, डोंगरमाथा, गायरानावर हे गवत लावले जाणार आहे. या गवताच्या शेतीमुळे परिसरातील पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना चारा उपलब्ध होणार आहे. तसेच दरवर्षी या भागातून चाऱ्यासाठी स्थलांतर करणाऱ्या मेंढपाळांचे स्थलांतर थांबवण्याचा उद्देश आहे, महत्त्वाचं म्हणजे या गवतामुळे जमिनीची धूप थांबवणे, त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ करण्याचा उद्देशही सफल होणार आहे, असे पाटील म्हणाले.

गवतासाठी विशिष्ट वाण दिनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि काळी धामण या विशिष्ट वाणांचे गवत लावण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या चार रोपवाटिकांमधून सुमारे १२ लाख रोपे सध्या तयार करण्यात आली आहेत. या वाणाच्या गवताची एकदा लागवड केल्यास पुढे तीन वर्षांपर्यंत गवत उपलब्ध होऊ शकते.

अडीच कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या गवत लागवड योजनेतून ही गवत रोपे लावली जाणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी रुपये आणि केंद्र शासनाच्या कॅम्पा योजनेतून ५० लाख रुपये असा साधारण अडीच कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT