Slight increase in cold in the state
Slight increase in cold in the state 
मुख्य बातम्या

राज्यात थंडीत किंचित वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र झाल्याने राज्यातील काही ठिकाणी थंडीत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अरबी समुद्राच्या परिसरात केरळ, कर्नाटक आणि अरबी समुद्राच्या काही भागांत अजूनही चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम आहे. केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असल्याने काही प्रमाणात मागील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण होते. मात्र आता अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थितीचा प्रभाव कमी होत असल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे थंडीसह दुपारी उन्हाच्या चटक्यातही काही अंशी वाढ झाली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कोकणात थंडी गायब झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या भागांत किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असल्याने किमान तापमान ११ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडीचा प्रभाव चांगलाच कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील अनेक भागांत थंडी अजूनही कायम आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT