एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेत
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेत 
मुख्य बातम्या

एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेत

टीम अॅग्रोवन

वणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथून काहीजण बीटी बियाण्यांचे १५ पाकीट घेऊन येत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना मिळाली. त्यांनी शिंदोला फाटा येथे सापळा रचून सहा जणांना अटक केली.  महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याकरिता गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांतून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी केली जात आहे. शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीश चवरे व तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांना कोरपना येथून दोन व्यक्ती एचटीबीटी बियाणे दुचाकीने आणत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शिंदोला फाट्याजवळ पोलिस उपनिरीक्षक डोंकलवार, योगेश ढाले, सुगत दिवेकर, संतोष उगडे, संजय खांडेकर, अभय मिश्रा यांनी सापळा रचला. संशयित दुचाकीची तपासणी केली. त्यांच्याजवळून काव्या, बिजी २ नावाचे पाच पाकिटे, १११ आदेश नावाचे पाच पाकिटे व रघु नऊ नावाचे पाच पाकिटे असे एकूण १५ हजार ५० रुपयांचे प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले.  हे बियाणे हिरापूर येथील एका कृषी केंद्रातून घेतल्याचे सांगितले. त्या कृषी केंद्रात पोचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी अन्य दोघांची नावे सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. एकूण सहा जणांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला. एचटीबीटी बियाणे गुजरातमधून येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. जळगाव व गुजरातमधील दोन व्यापाऱ्यांचा मागावर शिरपूर पोलिस आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  एचटी. बिटीचे बीजोत्पादन आणि पुरवठा आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच गुजरातमधून होतो. ही माहिती असतानाही तेथील मुख्य सूत्रधारांविरोधात कोणतीच कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT