बारामतीत रेशीम कोष खरेदी सुरू होणार
बारामतीत रेशीम कोष खरेदी सुरू होणार 
मुख्य बातम्या

बारामतीत रेशीम कोष खरेदी सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे : रेशीम उत्पादकांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, रेशीम संचालयाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यापुढे रेशीम उत्पादकांना बारामतीत रेशीम कोषाची विक्री करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांचा वेळ आणि पैसा यांची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांतील अनेक शेतकरी रेशीम उद्योग करतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाची विक्रीच्या सुविधा नसल्याने विक्री करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शेतकरी रेशीम कोष कर्नाटकात घेऊन जाऊन विक्री करत होते. तेथील व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक, कमी दर, राज्यात चांगली नसलेली विक्रीची सुविधा अशा विविध कारणांमुळे शेतकरी रेशीम उद्योगाकडे फारसे वळत नव्हते.   पुणे जिल्ह्यात जवळपास साडेपाचशेहून अधिक, तर पश्चिम महाराष्ट्रात सुमारे दोन ते तीन हजार एकरांवर रेशीम उद्योग शेतकरी करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रेशीम उत्पादनवाढीसाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उभी राहावी म्हणून पुणे जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला अखेर नागपूर येथील रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी मंजुरी दिली आहे. 

१५ जानेवारीपासून बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची खरेदी करण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी प्रियंका गणाचार्य यांनी दिली.  रेशीम संचालनालयाने बाजार समितीला घातलेल्या अटी ः 

  • कोषाच्या खुल्या खरेदी विक्रीसाठी पाच हजार स्क्वेअर फूट बंदिस्त शेड उपलब्ध करून द्यावा 
  • शेतकरी, रिलर्स व व्यापारी यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात
  • वजनकाटे, कोष साठवणूक सुविधा द्याव्यात
  • कोष खरेदी विक्रीअंतर्गत बोली करणे, त्यांचे वजन करणे, कोष खरेदीदाराकडून अनामत रक्कम जमा करणे, कोषाची रक्कम संबधित शेतकऱ्यांना अदा करणे या बाबी बाजार समितीने स्वतः कराव्यात. 
  • कोषाच्या वजन व किमतीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यासाठी शासकीय पावती रेशीम संचालनाल आणि बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मदतीने देतील. 
  • कोष खरेदी रकमेच्या तुलनेत प्रमाणात एक टक्के इतकी रक्कम व्यापाऱ्याकडून ‘मार्केट फी’ म्हणून आकारणी
  • क्रेट्स, ड्रायर्स, कोष साठवणूक जाळी या बाबी बाजार समितीस उपलब्ध करून देण्यात येतील. 
  • शेतकरी तसेच रिलर्स, व्यापारी यांच्या खरेदी विक्री रकमेची, पैसेची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीवर राहिली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT