संपामुळे बाजार समित्यांमध्ये शांतता
संपामुळे बाजार समित्यांमध्ये शांतता  
मुख्य बातम्या

नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

टीम अॅग्रोवन

नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांसह उपबाजार आवार, शासकीय गोदाम, मालधका व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.२६) लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामगार नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्य बाजार नाइलाजाने बंद ठेवण्यात आले होते.  माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन, सहकार, गृह व नगरविकास यांसह अन्य खात्यांकडे प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार व संबंधितांकडे अनेकदा पाठपुरावा केला, निवेदने सादर केली; मात्र प्रलंबित प्रश्नांकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी; अन्यथा पुढील तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही देण्यात आला; तसेच इतर प्रलंबित मागण्यांची सोडवणूक शासनाकडून तात्काळ व्हावी, असे संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी सांगितले.  या आहेत प्रमुख मागण्या

  • माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व त्या समितीवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे.
  • माथाडी मंडळाची पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे.
  • विविध माथाडी मंडळांतील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत कामगार विभागाने दिलेल्या परिपत्रकानुसार कामगार आयुक्त व माथाडी मंडळाकडून कार्यवाही होणे.
  • माथाडी मंडळात पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे.
  • नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्नाची सोडवणूक करणे.
  • विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT