Shrimp
Shrimp  
मुख्य बातम्या

चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील महत्वाचे बाजार बंद आहेत. त्यामुळे देशातून चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका बसला आहे. चीनमधून असणारी मागणी घटणार आहे, अशी माहिती ‘आयसीआरए’ने दिली.   भारत हा समुद्री उत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. विशेषतः कोळंबी निर्यात मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेनंतर चीन हा भारतीय कोळंबीचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने ६ लाख ९८ हजार टन आयात केली होती, तर चीनने ६ लाख ५० हजार टन समुद्री उत्पादनांची आयात केली होती.  ‘आयसीआरए’ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे, की कोळंबी निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या चीनच्या निर्यातीवर सर्वाधिक अवलंबून असतात त्यांना लगेच मोठा फटका बसत आहे आणि भविष्यात आणखी फटका बसेल. चीनमधून कोळंबीला उठाव न मिळाल्यास जागतिक बाजारात मालाचा पुरवठा वाढून दरावर परिणाम होईल. अतिरिक्त कोळंबी पुरवठ्यामुळे निर्यातदारांचे अधीक नुकसान होईल.  ‘‘जागतिक बाजारात कोळंबील पुरवठा येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा वाढल्यानंतर सध्या मिळत असलेल्या दरात मोठी घसरण होईल. चीनमध्ये कोरोना विषाणुचा कहर सुरु झाल्यानंतर इक्वेडॉरमध्यून आयात झालेल्या कोळंबीचे दर कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. इक्वेडॉर हे समुद्रीउत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचे देश आहे.  चीनमधील वितरण साखळी प्रभावित चीनमध्ये कोरोना पसरल्याने निर्यात झालेल्या मालाची वितरण साखळी प्रभावित झाली आहे. तसेच मागणीही कमी झाली आहे. आयात झालेला माल उतरविणे, साठवणूक, हाताळणी आणि प्रक्रिया आदी कामे प्रभावित झाली आहेत. ही कामे समुद्री उत्पादनाच्या वितरणात महत्त्वाची असतात. परंतु ही कामेच प्रभावित झाल्याने मूल्यसाखळीवर परिणाम झाला आहे. सध्याच्या वातावरणात निर्यात झालेला माल कंटेनरमधून उतरविणे खूपच अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या येथील पुरवठा कमी केला जात आहे, असे  ‘आयसीआरए’ने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT