प्रत्येक जिल्ह्याचे असावे ‘इन्व्हायर्न्मेंटल हेल्थ कार्ड’ Should belong to each district ‘Environmental Health Card’
प्रत्येक जिल्ह्याचे असावे ‘इन्व्हायर्न्मेंटल हेल्थ कार्ड’ Should belong to each district ‘Environmental Health Card’ 
मुख्य बातम्या

प्रत्येक जिल्ह्याचे असावे ‘इन्व्हायर्न्मेंटल हेल्थ कार्ड’

टीम अॅग्रोवन

नागपूर : पर्यावरणाचा सातत्याने होणारा ऱ्हास ही जागतिक समस्या आहे. मात्र, पर्यावरणाचा समतोल साधून विकास कसा करता येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे इन्व्हायर्न्मेंटल हेल्थ कार्ड असावे, असे मत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जे. एस. पांडे यांनी व्यक्त केले.  पांडे म्हणाल्या, की पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही पडताना दिसून येतो आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन ही सामाजिक जबाबदारी ठरलेली आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यावर काम करीत असताना, पर्यावरणशास्त्र प्रणालीचा वापर करीत, समृद्धता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे इन्व्हायर्न्मेंटल हेल्थकार्ड’ तयार करण्याची गरज आहे.  काय आहे इन्व्हायर्न्मेंटल हेल्थकार्ड  स्वतःचे हेल्थ चेकअप करताना व्यक्ती सगळे काही तपासून घेतो. मात्र, कधी पृथ्वीची हेल्थ कशी आहे, हे कधीच कुणी तपासत नाही. त्यामुळे ते तपासाच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. त्याचे मुख्य कारण वाढते शहरीकरण, औद्यागिकरण आणि वनक्षेत्राचा होणारा ऱ्हास आहे. मात्र, याला काही प्रमाणात चाप बसविण्यासाठी औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी, वनीकरण या प्रत्येक घटकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याचे नियमित ऑडिट करणे गरजेचे आहे. त्या-त्या जिल्ह्याच्या क्षमतेवर आधारित औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी, वनीकरण या प्रत्येक घटकांचा अभ्यास करून विकास केल्यास अर्थकारण रुळावर येईल. ‘४ जी’, ‘५ जी’च्या तरंगामुळे काय परिणाम होतील  पृथ्वीवर ज्या हालचाली होतात, त्या सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगामुळे होत असतात. त्याची एक पद्धती निश्‍चित आहे. त्यातून पृथ्वीचे संचालन करण्यात येते. मात्र, त्याचा पद्धतीत थोडाही बदल झाल्यास त्याचे दुष्परिणाम होताना दिसून येतात. ४ जी, ५ जीच्या तरंगाबाबत असे निश्‍चित काही संशोधन झाल्याचे दिसून येत नाही. मात्र, निश्‍चितच या तरंगामुळे पर्यावरणाच्या साखळीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. याचे कारण सूर्यापासून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग आणि यातील तरंग यामुळे त्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यातून काही प्रमाणात पक्ष्यांवर परिणाम होताना दिसून येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

SCROLL FOR NEXT