Ai in Agriculture: शेतकरी, रेस्टॉरंट अन् कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी क्रांती
American Food Innovation: अमेरिकेतील प्रवासामध्ये मला एक महत्त्वाची जाणीव झाली, की अन्नव्यवसायाचे खरं भविष्य हे शेतकऱ्यांचा थेट सहभाग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनात दडलेले आहे. सॅन फ्रान्सिस्को आणि मॅनहॅटनमध्ये मी प्रत्यक्ष पाहिले, की ग्राहक, हॉटेल आणि शेतकरी यांच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक वेगळं आणि पारदर्शक नातं निर्माण झालं आहे. हा बदल फक्त जेवणापुरता मर्यादित नसून संपूर्ण पुरवठा शृंखलेला एक नवी दिशा देणारा आहे.