बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी शरद पवार यांनी साधला संवाद
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी शरद पवार यांनी साधला संवाद 
मुख्य बातम्या

दुष्काळ निवारणासाठी आणखी सुधारणांची गरज : शरद पवार

टीम अॅग्रोवन

बीड : राज्यात दुष्काळाची तीव्रता असली तरी बीड जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. दुष्काळात सरकारने चारा छावण्या, टँकर अशी काही पावले उचलली असली, तरी आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. याप्रश्नी केंद्र व राज्य सरकारला भेटणार असून, त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. दुष्काळावर सकारात्मक निर्णय झाले तर सरकारला मदतच असेल. दुष्काळात कुठलेही राजकारण नसून एकत्र काम करण्याची भावना असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

श्री. पवार यांनी सोमवारी (ता. १३) नवगण राजुरी, खडकत (ता. आष्टी), पिंपळवंडी (ता. पाटोदा) आदी ठिकाणी चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, रोहित पवार, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, उषा दराडे, पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.  

श्री. पवार म्हणाले, की टँकर सुरू असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात खेपा नाहीत, अशुद्ध पाणीपुरवठा, चारा छावणी चालकांना देण्यात येणारे अनुदान वाढविण्याबाबत सरकारशी बोलून धोरण बदलण्याची विनंती करणार आहोत. फळबागा वाचविण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. पीकविम्याचा फायदा ९५ टक्के शेतकऱ्यांना होत नाही, त्यामुळे विमा कंपन्यांची सरकारने बैठक घेऊन मार्ग काढावा.

जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ३० टँकर देणार असल्याची माहिती या वेळी शरद पवार यांनी दिली. टँकरची भाडेपट्टी आणि इंधनाचा सर्व खर्च पक्षाच्या पुढाकाराने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

छावणीचालकांना अनुदान वाढवून द्यावे, जटील अटी रद्द कराव्यात आणि आतापर्यंतची देयके अदा करावीत, यासाठी छावणीचालक संघटनेने प्रशासनाला सोमवारपर्यंतची (ता. १३) मुदत दिली होती. याबाबतची माहिती संघटनेचे अशोक हिंगे यांनी श्री. पवार यांना सांगून छावण्या बंद करणार असल्याचे सांगितले. हा प्रश्न आपण सरकारच्या कानी घालू, धोरण बदलण्याची विनंती करू, त्यासाठी आठ दिवस छावण्या बंद करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर छावणीचालकांनी छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT