शरद पवार आजपासून तीन दिवस नागपुरात
शरद पवार आजपासून तीन दिवस नागपुरात 
मुख्य बातम्या

शरद पवार आजपासून तीन दिवस नागपुरात

टीम अॅग्रोवन

नागपूर ः भाजप, शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस विस्ताराच्या तयारीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवार (ता. १७) पासून नागपुरात येत आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला देखील ते उपस्थित राहतील. 

कधीकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याच विदर्भात नंतर शिवसेनेची व नजीकच्या काळात भाजपची ताकदही वाढली. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपले बळ वाढविता आले नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला चांगले यश मिळाले. भाजप, शिवसेनेबद्दलच्या नाराजीतून हे घडले. पक्षाचे सहा आमदार विजयी झाले. त्या पार्श्‍वभूमीवर पक्ष वाढीला दृष्टीने श्री. पवार प्रयत्नशील आहेत. मागील महिन्यात शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर संत्रा उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वतंत्र बैठक रवीनगरला घेतली. त्यानंतर महिनाभरातील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. 

मंगळवारी (ता. १७) दुपारी साडेचार वाजता ते विमानतळावर पोचतील. त्यानंतर सायंकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक ते घेतली. बुधवारी (ता. १८) विविध नेते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहतील. गुरुवारी (ता. १९) सकाळी ९ वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT