Seven 'corona' patients in Akola in a single day
Seven 'corona' patients in Akola in a single day 
मुख्य बातम्या

अकोल्यात एकाच दिवसात सात ‘कोरोना’ रूग्ण

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या नऊवर जाऊन पोचली तर बुलडाण्याचाही आकडा १५ झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात गुरुवारी (ता. नऊ) पातूर शहरात सात जण ‘कोरोना’ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी बुधवारी (ता. आठ) अकोल्यात शहरात दुसरा ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. 

गेल्या २४ तासांत १३ जण संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. त्यांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आत्तापर्यंत १३६ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८८ निगेटिव्ह आहेत. पातूर मधील सात रुग्णांचा संपर्क वाशीम जिल्ह्यातील रुग्णांसोबत आला होता. हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे सहा दिवस थांबला होता. त्या काळात पातूर येथील हे सात जण भेटून आले होते. एकाच शहरातील सात जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रशासन ॲक्शन मोडवर ‘कोरोना’ बाधितांचा आकडा दर दिवसाला वाढत चालला असल्याने आता नागरिकांना बाहेर फिरण्यापासून रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बँक व्यवहाराचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत ठेवण्यात आला असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेही आता १२ वाजेपर्यंतच उघडी ठेवली जात आहेत.

बुलडाण्याची संख्या १५ वर जिल्ह्यात तीन जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे आता एकूण ‘कोरोना’ बाधितांची संख्या १५ झाली आहे. यापैकी एकाचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील दोघे शेगाव व एक जण खामगाव तालुक्यातील आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT