फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे दर जाहीर
फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे दर जाहीर 
मुख्य बातम्या

फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे दर जाहीर

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांना वाजवी किमतीत चांगल्या दर्जाचे कलमे, रोपे मिळावी या उद्देशाने राज्यातील फळे व मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे विक्रीदर निश्चित करण्यात आले आहेत. विक्री दरामध्ये पाच ते वीस या दरम्यान वाढ करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठे व खासगी रोपवाटिकांना विक्रीदर हे लागू राहणार आहे.  याशिवाय निश्चित केलेले दर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम, तसेच विविध शासकीय योजनेअंतर्गत व किरकोळ विक्रीकरिता लागू असतील. यामध्ये कलमामधील (पिशवीतील) सुमारे २४ कलमाचा समावेश आहे. यात करवंद कलमाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. पिशवीविरहित रोपामधील बारा रोपांचा समावेश आहे. तर पिशवीतील पाच रोपांचा, तर दोन कलम कांड्याचा समावेश आहे.  राज्यात शासकीय १३६, कृषी विद्यापीठाच्या ४२ आणि खासगी ११९५ रोपवाटिका आहे. या रोपवाटिकामध्ये दरवर्षी एक कोटीहून अधिक रोपे तयार केली जातात. त्याच्या विक्रीतून जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, खासगी रोपवाटिकाधारक रोपांची विक्री ठरविलेल्या दरापेक्षाही अधिक रक्कम घेऊन विक्री करतात. त्यावर बंधन असण्यासाठी आणि शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेऊ नये यासाठी हे दर निश्चित केले जातात. राज्यातील कोणत्याही रोपवाटिकाधारकांनी ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊ नये, तसे आढळल्यास किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल केल्यास संबंधित रोपवाटिका धारकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.   फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे जाहीर केलेले दर (प्रतिरोप, कलम/रुपये)

  •  पिशवीतील कलमे ः आंबा कलमे ६०, काजू ५०, चिकू  ७०, पेरू ५०, डाळिंब ३५, संत्रा, मोसंबी ३०-४०, कागदी लिंबू ३०-३५, सिडलेस लिंबू ३०, आवळा ४०, चिंच (विकसित जात) ६०, कोकम ३०, फणस ३०, लिची २५, सीताफळ ४०, अंजीर ३५, जांभूळ (स्थानिक) ३०, जांभूळ कलमे (बहाडोली) ६०, जायफळ कलमे ६०, दालचिनी ३५, करवंद ३५,  
  •  पिशवी विरहित रोपे : जंबेरी रोपे २०, खिरणी रोपे २५, मिरी रोपे १५, तेलताड ४०, नारळ - बाणावली व इतर ७०, नारळ- टी डी १००, लवंग ३०, आवळा २०, कागदी लिंबू रोपे २५, जायफळ २५, जोजोबा २०, इतर रोपे २५. 
  •  पिशवीतील रोपे ः सुपारी रोपे ३०, डॉगरीज २५, जेट्रोफा १५, इतर २५, तेलताड ४० 
  •  कलम काड्या ः आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, आवळा, चिंच, बोर, चिक्कू ८, पानपिंपरी कलमकांड्या २ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT