सरळ वाण बियाण्यांचा खानदेशात तुटवडा 
सरळ वाण बियाण्यांचा खानदेशात तुटवडा  
मुख्य बातम्या

सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात तुटवडा 

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची पूर्वहंगामी (बागायती) लागवड केली जात आहे. पण या वाणांचा तुटवडा आहे. काळ्या बाजारास खतपाणी मिळत आहे. मागणी सुमारे तीन ते साडेतीन लाख पाकिटांची आहे, पण फक्त २५ हजार पाकिटांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे. 

केळी पट्ट्यात म्हणजेच जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आदी भागात अनेक शेतकरी केळी व इतर पिकांसाठी बेवड म्हणून सरळ किंवा देशी कापूस वाणांची लागवड करतात. ही लागवड पूर्वहंगामी अधिक असते. कारण केळी पट्ट्यात जलसाठे मुबलक आहेत. बऱ्यापैकी उत्पादन व बेवड मिळत असल्याने केळी पट्ट्यात या वाणांची अनेक वर्षे मागणी आहे. पण त्यांचा काळाबाजारदेखील अनेक वर्षे सुरू आहे. कंपन्याच कमी पुरवठा करतात, असा दावा कृषी विभाग करीत आहे. 

खानदेशात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ लाख ५२ हजार कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा यंदा होणार आहे. यात ९५ ते ९७ टक्के बियाणे बीटी कापसाचे आहे. धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती आहे. बीटी कापूस वाणांचा पुरवठा खानदेशात पुरेसा व वेगात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २२ लाख पाकिटे दाखल झाली आहेत. पण त्यात सरळ कापूस वाणांचा अत्यल्प पुरवठा झाला आहे. हेक्टरी किमान अडीच पाकिटे सरळ वाणांची लागवडीसाठी आवश्यक आहेत. खानदेशात किमान एक ते सव्वा लाख हेक्टरवर या वाणांची लागवड अपेक्षित असते. पण बियाणे पुरवठा दरवर्षी ३० ते ३५ हजार पाकिटे एवढाच असतो. यामुळे लागवड हव्या तेवढ्या क्षेत्रात होत नाही, शिवाय काळाबाजार फोफावतो. यंदाही हा काळाबाजार सुरू आहे. 

काळ्या बाजाराची व्यवस्था  काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातमधून या वाणांची उपलब्धता करून घेत आहेत. त्यासाठी पाकिटामागे १२०० ते १४०० रुपये मोजावे लागत आहेत. बियाण्याचा हा खर्च दुप्पट झाला आहे, त्यास कृषी यंत्रणा व संबंधित जबाबदार असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. काळाबाजार शेतकऱ्याला अपेक्षित नसतो, तो कसा सुरू होईल, याची व्यवस्था, नियोजनच जणू कृषी यंत्रणा व संबंधित हंगामाच्या सुरुवातीला करून ठेवतात. हा प्रकार रोखला जावा, अशी अपेक्षा एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT