Satara district in Loan distribution slows during Rabi season
Satara district in Loan distribution slows during Rabi season 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज वितरण संथगतीने 

टीम अॅग्रोवन

सातारा ः रब्बी हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वितरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेरीस एकूण उद्दिष्टांच्या ११ टक्के वितरण झाले आहे. कर्जमाफी योजनेकडे बँकांना लक्ष असल्यामुळे मार्चअखेर किती कर्ज वितरण होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकाचे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातील कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाकडून कर्ज वितरण न केल्यास कारवाईचा केवळ इशारा दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्यामुळे बँकाचा कानाडोळा सुरूच आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ९८० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी डिंसेबरअखेर १०९ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यापैकी गेल्या तीन महिन्यांत अवघे ११ टक्के कर्ज वितरण झाले आहे. रब्बी हंगामात पीककर्ज वितरणात सर्व बँकांची धोरणे उदासीन आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ४४६ कोटी ७० लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, यापैकी ५७ कोटी ३९ लाख रुपयांचे कर्ज वितरण करत अवघे १३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांत स्टेट ऑफ इंडियाने सर्वाधिक १९ कोटी ६६ लाखांचे पीककर्ज वितरण केले आहे. या बँकेने २० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. खासगी बॅंकांना १३१ कोटी ९० लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, यापैकी ३९ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज वितरण करत अवघे ३० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. खासगी बँकात आयसीआयसीआय बँकेने सर्वाधिक १४ कोटी १५ लाखांचे पीककर्ज वितरण केले आहे. या बँकेने १९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने १३ कोटी १७ लाख रुपयांचे म्हणजेच तीन टक्के कर्जाचे वितरण केले आहे. रब्बी कर्ज वितरणाची अंतिम मुदत मार्चअखेर आहे. बँकाकडून उर्वरित कालावधीत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT